अहमदनगर लाईव्ह24 टीम / नवी दिल्ली :- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. ती १ जानेवारी २०२० पासून लागू होणार आहे. आता महागाई भत्ता १७ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे.
माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com