अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- कारमध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील कारसह गुटखा, सुगंधी तंबाखु, पान मसाला सह दोन लाख 35 हजार 148 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तेजस दादासाहेब ढमे (रा. श्रीगोंदा फॅक्टरी ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. कारमधून एक तरूण गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती.
त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश पोलीस अंमलदार सचिन म्हस्के, एस.एस.फलके, अमोल आजबे, अमोल शिंदे यांच्या पथकाला दिली.
पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी अचानक छापा टाकला असता कारमध्ये गुटखा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार सचिन मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ढमे विरुद्ध भादंवि कलम 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 59, 26 ( 2 ) ( IV ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.