तो’ वाढदिवसाच्या दिवशीच सापडला बिबट्याच्या तावडीत आणि….

श्रीरामपूर : तालुक्यातील खोकर शिवारात रानडुकरं पकडण्यासाठी लावलेल्या वाघूरमध्ये अडकलेल्या बिबट्याने स्वत:ची सुटका करत पळ काढला. त्यानंतर जवळच असलेल्या दहावीचा परीक्षार्थी विद्याथ्र्याच्या दिशेने तो झेपावला. मात्र, दैवबलवत्तर म्हणून तो बचावला. 

बिबट्याला पाहिल्याने हा विद्यार्थी प्रचंड घाबरला होता, औषधोपचारानंतर तो सावरला. ऐन त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही घटना घडली.केवळ दैवबलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला.

खोकर- कारेगाव रस्त्यालगत गट नं.१५६ मध्ये वस्ती करून राहत असलेले शेतकरी राजेंद्र पवार हे सालाबाद प्रमाणे यावर्षीही खोकर येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथांची काठी सोबत मढी येथे गेले होते.

शुक्रवारी (दि.१३) दुपारी चार वाजेच्या दरम्यान त्यांचा इयत्ता दहावीत शिकत असलेला मुलगा निरंजन (वय १६) हा भूमिती या विषयाच्या पेपरचा अभ्यास करत होता.

या परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा त्रास आहे. काही शेतकऱ्यांनी विशिष्ट जमातीच्या लोकांना या भागातील रानडुकरं पकडण्यासाठी बोलविलेले होते. त्यांनी उसाच्या तीन बाजूंनी वाघूर लावले होते.

सोबतच्या कुर्त्यांच्या मदतीने व स्वत: काही लोकांनी आरडाओरड सुरू करून ऊसातील रानडुकरं वाघुरच्या दिशेने पिटाळण्यास सुरूवात केली. पण ऊसातून रानडुकरं बाहेर येण्याऐवजी बिबट्याच निघाला आणि तो वाघुरमध्ये अडकला. बिबट्याला पहाताच सर्वांचीच भंबेरी उडाली. तेथून सर्वांनीच पळ काढला.

काही वेळानंतर बिबट्याने स्वत:ची वाघूरमधून सुटका करत पळ काढला तो थेट निरंजन अभ्यास करत असलेल्या नारळाच्या झाडाकडे. तोपर्यंत निरंजन यास काहीच माहिती नव्हते. तो एकचित्त अभ्यास करत होता. त्याच झाडावर कावळ्यांचा गोंगाट सुरू झाल्याने त्या कावळ्यांना हुसकावण्यासाठी त्याने वर दगड फेकला आणि समोर बिबट्या उभा असलेला दिसला. काही कळायच्या आत निरंजनने तेथून धूम ठोकली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts