अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : कोपरगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिंगणापूर हद्दीतील संजीवनी कारखाना पेट्रोलपंपासमोर स्टेशन रोडवर राहणाऱ्या बाप-लेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. राहुल संजय फडे (27) आणि संजय रंगनाथ फडे (50) अशी मृतांची नावे आहे.
मुलाने शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घरातील पंख्याला दोरी बांधून गळाफास घेऊन आत्महत्या केली होती.हे पाहिल्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास बापानेही गळाफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घरातील कौटुंबिक कलहामुळे बापलेकाने आत्महत्या केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. पोलीस खऱ्या कारणाचा शोध घेत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews