ब्रेकिंग

Ahmednagar Breaking : ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात, मुलीच्या भेटीस निघालेल्या आईचा चिरडून मृत्यू

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताच्या घटना सातत्याने सुरूच आहेत. जिल्ह्यातील काही घटना ताजा असतानाच आता आणखी एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे.

मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांच्या दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिल्याने आईचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. या अपघातात महिलेचा पती वाचला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात लासलगाव-शिर्डी रस्त्यावर रविवारी दुपारी हा अपघात घडला.

आरती सुभाष राऊत (वय ३५, रा. वणी बाबापूर, जि. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. सुभाष गुलाब राऊत (वय ४०) हे अपघातातून बचावले आहेत.

अधिक माहिती अशी : आरती व सुभाष हे दोघे रविवारी लोणी येथे शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी श्रद्धा हिला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. हे दोघे कोळपेवाडी शिवारात आले असता त्यांना ट्रकने (एमएच १८ बीजी ६५७९) पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने दोघेही खाली पडले.

आरती या ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. सुभाष राऊत हे बाजूला फेकले गेले. अपघातानंतर ट्रकचालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदत कार्य केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts