कोरोना बाधितांच्या ‘डिस्चार्ज’बाबत नव्या सूचनांची अंमलबजावणी,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आदेश जारी !

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-   कोविड -19 पॉझिटीव्‍ह रुग्‍णांचे सौम्य, मधम आणि गंभीर रुग्ण या तीन प्रकारामध्‍ये वर्गीकरण करून त्‍याबाबतचा उपचार ट्रिटमेंट) प्रोटोकॉल तसेच सुधारित डिस्‍चार्ज पॉलिसीची अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड -19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणुन घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

कोविड -19 पॉझिटीव्‍ह रुग्‍णांचे सौम्य, मध्यम आणि गंभीर या तीन प्रकारामध्‍ये वर्गीकरण करून त्‍याबाबतचा ट्रिटमेंट प्रोटोकॉल तसेच सुधारित डिस्‍चार्ज पॉलिसीची अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने दिलेले आहेत.या प्रोटोकॉलनुसार अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये रुग्‍णांस लक्षणे उद्भवल्‍यापासून कोविड -19 तपासणी अहवाल येईपर्यत साधारणतः 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागत असल्‍याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे या निर्देशानुसार कोरोना पॉझिटीव्‍ह रुग्‍णांना डिस्‍चार्ज करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी खालील प्रमाणे सुचनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत

यामध्ये Mild(सौम्‍य)/very mild(अतिसौम्‍य) /pre-symptomatic(लक्षणे पूर्वी) /A- symptomatic (लक्षणे नसलेली) कोरोना बाधित रुग्ण- या प्रकारातील रुग्ण असतील तर अशा कोरोना पॉझिटीव्‍ह रुग्‍णांचे दैनंदिन शाररीक तापमान व SPO2 तपासणी करण्‍यात यावी. सदर रुग्‍णांना स्‍वॅब घेतल्‍यापासून 7 दिवसानंतर (5, 6 व 7 व्‍या दिवशी ताप नसल्‍यास तसेच SPO2 95 % पेक्षा कमी नसल्‍यास) डिस्‍चार्ज देण्‍यात यावा. डिस्‍चार्ज देण्‍यापुर्वी कोविड चाचणी करण्‍याची आवश्‍यकता नाही.

डिस्‍चार्ज नंतर रुग्‍णांने 7 दिवस गृह अलगीकरण ( Home Isolation) मध्‍ये राहणे बंधनकारक राहिल. या कालावधीत रुग्‍णांने स्‍वतःच्‍या तब्‍येतीचे स्‍वतः निरिक्षण करावे व ताप/खोकला किंवा श्‍वसनास त्रास जाणवल्‍यास नजीकचे कोविड केअर सेंटर येथे त्‍वरीत संपर्क साधावा. ( कोविड केअर सेंटर मधून डिस्‍चार्ज होण्‍यापूर्वीच जर रुग्‍णांचे SPO2 95 % पेक्षा कमी गेलं तर त्‍याला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) यांच्याकडे संदर्भित करावे.

2. मध्यम स्वरूपाची लक्षणे असणारी आणि डीसीएचसी मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्ण बाबतीत ( Moderate cases admitted to Dedicated COVID Health Centre (Oxygen beds):

2.1 डीसीएचसी मध्‍ये दाखल रुग्‍णांचे दैनंदिन शारीरीक तापमान व SPO2 तपासणी करण्‍यात यावी. ज्‍या रुग्‍णांच्‍या तापाचे 3 दिवसांचे आत निराकरण होईल व पुढील 4 दिवसामध्‍ये ऑक्‍सीजन सॅ‍च्‍यूरेशन (Without oxygen support) 95 % पर्यत संतुलित राहील अशा रुग्‍णांना Symptoms (लक्षणे) उद्भवल्‍यापासून 10 दिवसानंतर ताप नसेल, श्वसनाच्या त्रास होत नसेल आणि ऑक्सिजनची आवश्यकता लागणार नसेल तर अशा स्थितीमध्‍ये असल्‍यास डिस्‍चार्ज देण्‍यात यावा.
डिस्‍चार्ज देण्‍यापुर्वी कोविड चाचणी करण्‍याची आवश्‍यकता नाही. डिस्‍चार्ज नंतर रुग्‍णांने 7 दिवस गृह अलगीकरण ( Home Isolation) मध्‍ये राहणे बंधनकारक राहिल. या कालावधीत रुग्‍णांने स्‍वतःच्‍या तब्‍येतीचे स्‍वतः निरिक्षण करावे आणि काही त्रास जाणवल्‍यास नजिकचे चिकित्‍सक यांचेशी संपर्क साधणे.

2.2 ऑक्‍सीजन वरील रुग्‍ण ज्‍याच्‍या तापाचे 3 दिवसांत निराकरण झाले नाही आणि ऑक्‍सीजन थेरपीची आवश्‍यकता आहे अशा रुग्‍णांना खालील परिस्थिती मध्‍येच डिस्‍चार्ज देण्‍यात येईल. क्लिनिकल लक्षणे नसतील, ऑक्सिजन सैचुरेशन सलग ३ दिवस स्थिर असेल. आणि इतर आजार असतील तर अशा गंभीर असलेल्‍या रुग्‍णांचा डिस्‍चार्ज क्लिनिकल रीकवरी (Clincal recovery) आणि आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी अहवाल निगेटीव्‍ह आल्‍यानंतर करण्‍यात यावा.

तपासणी अहवालानुसार कोरोनाची बाधा झाल्‍याचे आढळून आलेल्‍या रुग्‍ण/व्‍यक्‍ती यांना कोणत्‍याही परिस्थितीत गृह अलगीकरण (Home Isolation) होता येणार नाही. तसे झाल्‍याचे आढळून आल्‍यास त्‍यांचेवर साथ रोग अधिनियम 1897 मधील तरतूदीनुसार कारवाई करण्‍यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदीनूसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24