‘ह्या’ शहरात कोरोनाने घेतला चौथा बळी

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत.

शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. त्यामुळे नेवासे शहरात जनता कर्फ्यू लागू केला होता. आता शहरात कोरोनाचा चौथा बळी गेल्याची माहिती तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी दिली.

काल (शनिवार) १५ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 65 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचे निदान झाले होते.

त्यानंतर या 65 वर्षीय व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नेवासा येथील कोविड केअर सेंटर मध्ये प्रथम ऑक्सिजन लावण्यात आला मात्र

तरी देखील श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले होते. आज त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढताना दिसत आहे. रविवारी सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात

१२ हजार पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी १० हजार ८१ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर १५३ मृत्यू झाले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts