आमदार नसल्याचे दुःख नसून जनता हीच आमचा देव धर्म

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी खासदार (स्व.) दादा पाटील शेळके हे चार वेळा आमदार तर दोन वेळा खासदार राहिले. जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांची राज्याला वेगळी ओळख होती. शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावून मोठया कष्टाने त्यांनी नगरचे नाव राज्याच्या व देशाच्या नकाशावर नेले, त्यामुळे बाजार समितीचे नामांतर कुठल्याही राजकीय हेतूने केले नसल्याचा टोला माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी लगावला.

नगर बाजार समितीचे कर्डिले यांच्या हस्ते शनिवारी (दि. 22) माजी खासदार (कै.) दादा पाटील शेळके असे नामांतर करण्यात आले. या प्रसंगी पोपटराव पवार यांना भारत सरकारतर्फे मिळालेल्या पद्मश्री सन्मानाबद्दल, तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याच्या सन्मानार्थ प्रताप पाटील शेळके यांचा नगर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अरुण जगताप होते. प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती विलासराव शिंदे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब पाटील शेळके, दादाभाऊ चितळकर, पारनेर बाजार समिती चे प्रशांत गायकवाड, अविनाश घुले, युवानेते अक्षय कर्डिले, आदी उपस्थित होते.

बाजार समितीचे उपसभती रेवणनाथ चोभे यांनी अध्यक्षीय निवड केली. कर्डिले म्हणाले, दादा पाटील यांच्या बोटाला धरूनच सर्व राजकारणात आले, त्यांच्या स्मृती चिरकाल रहाव्या यासाठी तसेच त्यांचे कार्य पाहून आम्ही बाजार समितीला नाव दिले. आता आमदार नसल्याचे दुःख नसून जनता हीच आमचा देव धर्म आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts