अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे अद्यापही फरार आहे.
दरम्यान दरदिवशी बोठेच्या अडचणीत भर पडत आहे. बोठे गेल्या महिन्याभरापासून फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असली तरी त्यांना अद्याप बोठेचा ठावठिकाणा लागलेला नाही.
दरम्यान बोठेचा शोध घेण्यासाठी आता आक्रमक पाऊले उचलली आहे. बोठे याला अटक करण्यासाठी पोलिसांना ‘स्टँडिग वॉरंट’ हवे आहे. त्यासाठी पोलिसांनी पारनेरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
त्यावर आज सोमवार (04 जानेवारी) रोजी सुनावणी होणार आहे. असे वॉरंट मिळाल्यानंतर पोलिसांना राज्यात आणि अन्य राज्यांतही आरोपीचा शोध घेण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली होती.