Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आंदोलन सुरु आहे. उपोषण व इतर मार्गाने आंदोलन झल्यानंतर सरकारकडून काहीच पाऊले उचलली जात नसल्याने आता मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईत धडकणार आहेत.
मनोज जरांगे हे मुंबईत आमरण उपोषण करणार असून यासाठी लाखो मराठे त्याठिकाणी जातील. यासाठी मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक २० जानेवारीला सकाळी ९ वाजता मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. वाटेत त्यांना लाखो मराठे सोबत येऊन मिळतील.
पण ते कोणत्या मार्गाने जाणार, कसे जाणार? त्यांचा मार्ग कसा असणार? प्लॅनिंग कस असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत आज मनोज जरांगे पाटील यांनी खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई हे अंतर मनोज जरांगे पायी पार करणार असून यावेळी मराठा आंदोलकांनी कशाप्रकारे तयारी करावी याबद्दल मनोज जरांगे यांनी खुलासा केला आहे.
असा असेल मार्ग
अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर मराठा मोर्चा बीडमध्ये येईल. त्यानंतर हा मोर्चा जालना-शहागड,-गेवराई-अहमदनगर-शिरुर-शिक्रापूर, रांजणगाव-खराडी-शिवाजीनगर-पुणे-लोणावळा-पनवेल- वाशी-चेंबूर-शिवाजी पार्क असा प्रवास करत आझाद मैदानात पोहोचणार आहे.
मुंबईकडे जाताना मराठा आंदोलकांची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागणी होणार असून या तुकडीच्या प्रमुखांनी आपापल्या लोकांची काळजी घ्यायची असून कोणत्याही तुकडीतील लोक उद्रेक किंवा जाळपोळ करणार नाहीत याची जबाबदारी संबंधित तुकडी प्रमुखाची असणार आहे.
सोबत असणार शिदोरी
मुबंईत जाईपर्यंत मार्गात येणाऱ्या गावांकडून आपल्या खाण्यापिण्याची सोय होईल अशी अपेक्षा आहे. एखाद्या गावात सोया झाली नाही तरी मोर्चेकऱ्यांनी तयारीत राहावे व आपल्यासोबतच्या वाहनात स्वयंपाकाची सामुग्री आणि गरजेच्या सर्व गोष्टी आणल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
आपलं वाहन हेच आपलं घर असं समजून ऊन, पाऊस, थंडी यापासून रक्षण करण्यासाठी याच वाहनांचा वापर कराव तसेच प्रवासात काही दुखलं तर औषधाच्या गोळ्या सोबत ठेवा असेही आवाहन करण्यात आले आहे.