अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : लालटाकी सिव्हिल हॉस्पिटल येथे गेल्या 100 ते 150 वर्षापूर्वीचे पुरातन असलेले लक्ष्मी आईचे मंदिर पाडण्यात येणार आहे, असे आम्हाला समजले आहे.
परंतु सदर मंदिर हे गवळी समाजाबरोबर सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पाडत असतात.
हे पुरातन मंदिर सिव्हिल हॉस्पिटल होण्याच्या अगोदरपासून सदर जागेवर असून, सिव्हिल हॉस्पिटलची इमारत नंतर बांधण्यात आलेली आहे.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले गेले नाही. येथून पुढील काळातही शासनाच्या नियम व आदेशाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येईल.
तरी सदर मंदिर पाडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न झाल्यास गवळी समाजाबरोबरच सर्व धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणार असून, भक्तांमध्ये तीव्र संताप निर्माण होणार आहे.
या धार्मिक भावना दुखावणार असल्यामुळे सदर मंदिर पाडण्याचा परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे पत्र निवेदनाद्वारे वीरशैव लिंगायत गवळी समाज ट्रस्टच्यावतीने प्रशासनास देताना अध्यक्ष प्रकाश भागानगरे,
उपाध्यक्ष रखमाजी निस्ताने, हिरामन बेंद्रे, संतोष गेनप्पा, सतिष हरबा, सुभाष भागानगरे, हुच्चे भाऊसाहेब, गोविंद मिसाळ, आप्पा बारसे, चंद्रकांत औशिकर, विष्णू कलागते, संतोष उन्हाळे, शंकर पंगुडवाले आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews