अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर नराधमाने आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, आरोपी अमोल शिंदे याने पारगाव सुद्रीक येथील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करून पारगाव रोडवरील बायपास वर बोलावून घेतले. पीडितेची आई त्यावेळी घरात झोपली होती व भाऊ कामानिमित्त काष्टी येथे गेला होता.
बायपासवर गेल्यानंतर आरोपीने मोटारसायकल वर बसण्याचा आग्रह केला. मुलीने नकार दिल्याने त्याने हाताला ओढून बळजबरीने तिला गाडीवर बसवले. त्याने गाडी श्रीगोंदा शहरातील सृष्टी हॉटेलवर नेले. ओळखपत्र नसल्याने त्याना हॉटेलच्या लॉजिगवर प्रवेश मिळाला नाही.
आरोपीने लगेच तिला गाडीवर बसवून त्याच्या राहत्या घरी घेऊन गेला. ओळखपत्र घेऊन तिला पुन्हा सृष्टी हॉटेलवर आला आणि खोली भाड्याने घेतली. खोलीमध्ये बळजबरीने ओढून पीडितेच्या अनेकदा इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून बळजबरी केली.
त्याने पहाटे फिर्यादीला घरी सोडल्यानंतर पीडितेने हा प्रकार आई व भावाला झालेला प्रकार सांगितला . त्यानंतर माझ्या भावाने व मेहुण्याने पीडितेला घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणले.
त्यानंतर आरोपी अमोल शिंदे याच्याविरोधात बलात्कारासह बाल लैगिंक प्रतिबंधक कायद्यानुसार फिर्याद दाखल करण्यात आला.