अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- भारतीय जनात पक्षाच्या आमदार मोनिका राजळे या कोरोना बाधीत रुग्ण महिलेच्या संपर्कात आल्याने त्यांनी होमक्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे.
शनिवारी रात्री जिल्हा शासकिय रुग्णालयात राजळे यांच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तरीही राजळे यांनी नगर येथील घरीच क्वारंटाईन होवुन जनसंपर्क टाळला आहे.
आमदार मोनिका राजळे या त्यांच्या जवळच्या नातलग असणाऱ्या महिलेच्या संपर्कात आल्या होत्या. नातलग असणाऱ्या महिला या कोरोना बाधीत असल्याचा अहवाल मिळाला.
त्यानंतर राजळे यांनीही तपासणी शनिवारी जिल्हा शासकिय रुग्णालयात करुन घेतली. त्यात अहवाल निगेटीव्ह आला. तरीही आपल्यामुळे इतरांना कोनाला त्रास नको यासाठी राजळे या रविवारपासुन नगरच्या घरी क्वारंटाईन झाल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com