अहमदनगर :- माजी आमदार अनिल राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. त्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासमोर सुनावणी झाली आहे.
राठोड यांच्यावर दगडफेक, सरकारी कामात अडथळा आणण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. राठोड यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव पोलिसांने तयार केला आहे.
राठोड यांच्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.शहराची शांतता धोक्यात आली, असे प्रस्तावात म्हटले आहे.
हा प्रस्ताव प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे सादर झाल्यावर त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मिटके यांच्याकडे पाठवला.
म्हणणे सादर करण्यासाठी मिटके यांनी राठोड यांना नोटीस पाठवली होती. प्रस्तावाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अभिप्रायासह प्रांताधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाईल.
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांना शहरबंदी करण्यात आली होती. मात्र, त्यात माजी आमदार राठोड यांचा समावेश नव्हता.
आता पोलिसांनी थेट त्यांच्या तडीपारीचाच प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे.