अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता नव्या बुरशीजन्य आजाराचे संकट आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपासून म्युकरमायक्रोसिस म्हणजेच काळ्या बुरशीचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय सध्या जिल्ह्यात म्युकाेरमायकाॅसिस आजाराचे 61 रुग्णांची नाेंद झाली आहे.
या रुग्णांवर नगर शहरातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल बाेरगे यांनी या माहितीला दुजाेरा दिला. त्याचबराेबर जिल्हा रुग्णालयाकडे 8 रुग्णांची नाेंद आहे.
त्यातील दाेघांचा काेराेना संसर्गामुळे मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणा यांनी दिली. काेराेना संसर्गापाठाेपाठ म्युकाेरमायकाॅसिस आजाराने नगर जिल्ह्यात डाेके वर काढले आहे.
नगर शहरातील खाजगी रुग्णालयांकडून महापालिकेने म्युकाेरमायकाॅसिस आजारावर उपचार घेणाऱ्यांची माहिती आज गाेळा केली. त्यात खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या 61 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समाेर आले. हे रुग्ण नेमके काेणत्या तालुक्यातील आहे, याची माहिती महापालिकेच्या आराेग्य विभाग घेत आहे.
हा आजार बरा हाेण्यासारखा आहे. प्राथमिक लक्षणे आढळताच त्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल हाेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनील पाेखरणा आणि महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल बाेरगे यांनी केले आहे.
कोरामायकोसिस म्हणजे काय ? :- म्यूकोमाइकायटीस नावाची लहान बुरशी आहे. जेव्हा बरे झालेल्या रुग्णाला कोरोनामधून श्वास घेता येतो तेव्हा ही बुरशी त्याच्या सिनल पोकळीसह लँगलमध्ये बसते. तथापि, पोस्ट कोविड रूग्ण ज्या प्रकारच्या समस्येचा सामना करीत आहेत
त्यासाठी बुरशी किंवा स्टिरॉइड्स जबाबदार आहेत काय? या संदर्भात अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. परंतु बहुतेक लोक ज्या प्रकारच्या समस्येचे वर्णन करीत आहेत त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांना ही समस्या भेडसावत आहे.
काळी बुरशीजन्य संसर्ग कसे ओळखावे :- जेव्हा काळ्या बुरशीजन्य संसर्गाचा प्रसार होतो तेव्हा त्याचा चेहरा चेहर्यावर दिसून येतो, ज्यामुळे चेहरा बदलतो, तसेच अर्थपूर्ण क्षमता तसेच महत्त्वपूर्ण अवयवांच्या व्यतिरिक्त. जेव्हा काळी बुरशीजन्य सायनस पोकळीमध्ये बसते, त्याचा प्रभाव दर्शविते तेव्हा सतत वेदना आणि डोकेदुखी होते.