फोनवर किती बोलतेस?’ असे विचारल्याचा राग आल्याने आईचा मुलावर चाकूहल्ला !

नेवासे :- नेवासे तालुक्यातील गिडेगाव येथे ‘फोनवर किती बोलतेस?’ असे विचारल्याचा राग येऊन आईने मुलाचे तोंड दाबून त्याच्यावर चाकूने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.

जखमी विशाल दीपक साळुंखे (१८) याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची आई शोभा दीपक साळुंखे हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पाेलिसांनी शाेभाला अटकही केली. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शोभा फोनवर बोलत होती. तिचा मुलगा विशाल म्हणाला, ‘किती वेळ फोनवर बोलतेस?’ त्यावर ‘मी कितीही वेळ बोलेन, तुला काय करायचे?’ असे आई रागाने म्हणाली.

त्यानंतर विशाल जेवण करून बाहेर अंगणात झोपला. मध्यरात्री दीडच्या सुमारास आईने त्याचे ताेंड दाबले. काही कळायच्या आत आईने हातातील चाकूने त्याच्या कानाखाली व तोंडावर वार केले.

विशालने हाताने चाकू धरण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या हातावरही तिने वार केला. ‘तुझ्यात किती बळ आहे ते पाहतेच,’ असे म्हणत आईने त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. विशालने कशी तरी सुटका करून घेतली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts