पंचायत समिती कार्यालयात पदाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये दारूपार्टी !

अकोले :- पंचायत समिती कार्यालयात एका पदाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गुरूवारी दारूपार्टी झाली असून याची चौकशी करण्याची मागणी करत आचारसंहिता भंगाची तक्रार गटविकास करण्यात आली.

या तक्रारीवर शिवसेनेचे रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, प्रमोद मंडलिक, प्रदीप हासे, राम सहाणे, संजय साबळे, सखाराम लांडे, मारुती आभाळे, रजनिकांत भांगरे, महेश हासे, संदेश एखंडे यांची नावे आहेत.

रात्री ८ वाजता झालेल्या पार्टीला १० ते १५ जण होते. पार्टी होत असताना दिवे बंद करण्यात आले होते. पार्टीसाठी संगमनेर तालुक्यातील काही लोक व उर्वरित तालुक्यातील काही लोक उपस्थित होते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts