आ.शिवाजी कर्डिलेंकडून जीवे मारण्याची धमकी !

अहमदनगर :- आ. शिवाजी कर्डिले यांनी पिस्तूल रोखत डॉ. प्रकाश कांकरिया व मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी साक्ष प्रत्यक्षदर्शी मिलिंद मोभारकर यांनी न्यायालयात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर हद्दीतील जमिनीच्या व्यवहारातील ९२ लाख रुपये परत मागितल्याने कर्डिले यांनी ही धमकी दिल्याचे मोभारकर यांनी सोमवारी न्यायालयासमोर सांगितले.

फसवणूक प्रकरणी २०११ मध्ये गुन्हा.

बुऱ्हाणनगर हद्दीतील २३ एकर जमिनीच्या व्यवहारात डॉ. कांकरिया यांची ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आमदार कर्डिले यांच्या विरोधात २०११ मध्ये गुन्हा दाखल असून या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

९२ लाख रुपये परत मागितले पण….

कांकरिया यांना बुऱ्हाणनगर हद्दीतील २३ एकर जमीन खरेदी करायची होती. आ. कर्डिले व कांकरिया यांच्या व्यवहाराची बोलणी झाली होती. जमिनीचे साठेखत झाले होते, त्याचे ९२ लाख रुपये कांकरिया यांनी कर्डिले यांना दिले होते.मात्र, ही जमीन डॉ. रावसाहेब अनभुले यांना विकण्यात आली. त्यामुळे कांकरिया यांनी ९२ लाख रुपये परत मागितले.

पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी..

कर्डिले यांनी कांकरिया यांना बंगल्यावर पैसे घेण्यासाठी बोलावले होते. त्यानुसार कांकरिया व मोभारकर हे कर्डिले यांच्या बंगल्यावर गेले. परंतु कर्डिले यांनी पैसे देण्याऐवजी पिस्तूल रोखत कांकरिया व मला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी साक्ष मोभारकर यांनी न्यायालयासमोर दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts