अहमदनगर :- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा निषेधार्थ शीख, पंजाबी, सिंधी समाज, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लायन्स प्राईड व जीएनडी ग्रुपच्या तारकपूरच्या वतीने दिल्लीगेट येथून हुतात्मा स्मारक पर्यंन्त कॅन्डल मार्च काढण्यात आला.
या रॅलीत आरएसएस, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवान, स्नेहालय, पंजाबी सेवा समिती, भारत भारती आदि स्वयंसेवी संघटना सहभागी झाल्या होत्या. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निघालेल्या रॅलीचा समारोप हुतात्मा स्मारकात झाला.
यावेळी हरजितसिंह वधवा, संदेश कटारिया, सुहास कुंदे, गिरीश कुलकर्णी, मधुसूदन मुळे, मोहित पंजाबी, सुनिल सहानी, सतीश गंभीर, सनी धुप्पर, पुनित भुतानी, राज गुलाटी, सनी वधवा, किशोर कंत्रोड, सन्मित कनोजिया, सतिंदरसिंग नारंग आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. तर हुतात्मा स्मारक येथे मेणबत्त्या प्रज्वलीत करुन शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रध्दांजली वाहिली.