अकोले :- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुतोडी येथील राजेंद्र देवराम आहेर (वय २७) या तरुणाने गुरुवार दिनांक २१ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केले.
राजूर येथे त्याच्या सासुरवाडीला तो पत्नीला आणायला गेला होता. त्यास नाशिक येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथे त्याचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राजेंद्र आहेर (रा. दुतोडी, ता. त्र्यंबकेश्वर) हा त्याच्या पत्नीला आणायला राजूर (ता. अकोले) येथे सासुरवाडीला गेला होता.
दि. २१ मार्च २०१९ रोजी ५ वाजता काही तरी कारणावरून त्याने विषारी औषध प्राशन केले. त्याचा मेहुणा रामेश्वर येलमामे याने त्यास राजूर येथील हॉस्पिटलमध्ये नेले व तेथुन त्यास नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले.
त्यास रात्री ९.५१ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक फौजदार दुसाने यांनी याची खबर पोलीस ठाण्यात दिली.