भाजप सरकारची कुटील नीती : प्राजक्त तनपुरे

राहुरी : राज्य सहकारी बँकेत शरद पवार यांचा कुठलाही संबंध नसताना मात्र आगामी निवडणुकीच्या रिंगणात दडपणे येतील म्हणून एक प्रकारची कुटील नीती वापरण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू झाल्याचा आरोप राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला.

शिखर बँकेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी इडीने देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा संबंध जोडल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राहुरी तहसील कार्यालयावर राहुरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नगर-मनमाड राज्य मार्गालगत असलेल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सकाळी साडेअकरा वाजता निषेध मोर्चाला सुरुवात झाली.

शहरातून शनिमंदिर मार्गे तहसील कार्याल्यावर मोर्चा गेल्यानंतर सभेत रूपांतर झाले. प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले सहकारी संस्था रसातळाला नेवून लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे.

मोर्चात जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, शब्बीर देशमुख, उपनगराध्यक्ष दिलीप चौधरी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, दिलीप जठार, दत्ता कवाणे, कान्हू मोरे यांच्यासह सहभागी झाले होते. तहसीलदार फसेउद्दीन शेख यांना मोर्चेकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुरीत नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts