टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.

अहमदनगर :- निंबळककडून सनफार्मा चौकाकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरुन वेगात येणाऱ्या टेम्पोने जोरात धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार राजेंद्र लक्ष्मण निकम (वय ३५, रा.विळद) याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना मनमाड रोडवरील दादा पाटील पेट्रोल पंपासमोर, सनफार्मा चौक, निंबळक रोड येथे मंगळवारी दि.२२ सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, राजेंद्र लक्ष्मण निकम हे त्यांच्या लहान मुलीस मोटारसायकल पाठीमागे बसवून निंबळक बाजूकडून सनफार्मा चौकाकडे येत असताना दादा पाटील पेट्रोल पंपासमोर आले असता समोरुन वेगात येणाऱ्या आयशर टेम्पो (क्रमांक एमएच १७, ए.जी. ६७३०) ने त्यांना जोरात धडक दिली.

धडक इतकी जोरात होती की, राजेंद्र निकम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यामागे बसलेली त्यांची मुलगीही जखमी झाली. अपघात होताच टेम्पोचालक टेम्पो घटनास्थळी सोडून पसार झाला. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts