विरोधकांकडून पाण्याचे राजकारण : आ. राजळे

करंजी : पाथर्डी -शेवगाव मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव विकास निधी आणला. दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाण्याची गरज असल्याने मुळा धरणातून डावा व उजवा कालव्याला पाणी सोडले,

पाटाला पाणी सोडताना टेलकडून हेडकडे पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिलेल्या असतान विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने त्यांनी पाणीप्रश्नाचे राजकारण पुढे करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला असल्याची टीका आ मोनिका राजळे यांनी केली.

पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे, कासारवाडी, जवखेडेखालसा येथे सव्वाचार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळयाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी सभापती उद्धवराव वाघ होते.

प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, पं.स. सदस्य राहुल गवळी, सुनील परदेशी, एकनाथ आटकर, जे.बी. वांढेकर, सरपंच भाऊसाहेब उघडे, माजी सरपंच संतोष शिंदे, के. एम. मचे, नारायण कराळे, सुनील पुंड, पोपटराव कराळे,

सतीश कराळे, भीमराज पाटेकर, वसंत नेहूल, संदीप नेहूल, वृध्देश्वरचे संचालक चारूदत्त वाघ, युवानेते अमोल वाघ, ॲड. वैभव आंधळे, माजी सरपंच सुरेश वाघ, राजू आंधळे, उपसरपंच उत्तम कासार सर, बाळासाहेब भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आ. राजळे म्हणाल्या.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त योजनेच्या माध्यमातून मतदारसंघात भरीव कामे करता आली. तसेच पंतप्रधान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून भरीव निधी आणला.

विकास कामांबाबत बोलण्यासारखे काहीच नसल्याने विरोधक भावनिक मुद्दे पुढे करत सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पाटाला पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद होऊ नये, तसेच नवीन चारा छावण्यांना सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दोन्ही प्रश्न सोडूवू, असे आ. राजळे म्हणाल्या.

या वेळी उध्दवराव वाघ म्हणाले, आताचे राजकारण डिजीटल पध्दतीचे झाले आहे. विकास कामांच्या माध्यमातून गावातील गटतट विसरून सर्वजण एकत्र आल्याचे समाधान वाघ यांनी या वेळी व्यक्त केले.

सत्काराला फाटा देत ग्रामपंचायतीच्या वतीने पदाधिकाऱ्यांचे अकरा हजार रुपये मानधन पूरग्रस्तांसाठी आ. राजळेंकडे देण्यात आले. प्रास्तविक चारूदत्त वाघ यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी वाघमारे सर यांनी केले. ॲड. वैभव आंधळे यांनी आभार मानले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts