श्रीरामपूर: तालुक्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले असून कोण कोणाच्या बाजूने हेच कळेनासे झाले.
त्यात नगराध्यक्षा अनुराधा आदिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांनी आघाडीच्या बाजूने समर्थन करतील म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांचा प्रचार करतील असे चित्र दिसत असतांना उमेदवार लहू कानडे यांच्या एकही प्रचार सभेला व बैठकीला नगराध्यक्षा अनुराधा आदिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक उपस्थित नव्हते.
तर एकीकडे आदिकांचे कार्यकर्ते महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवारआ.भाऊसाहेब कांबळेंचे समर्थन करताना दिसत असल्यामुळे शांततेची भूमिका घेतलेले आदिक आ.भाऊसाहेब कांबळेंना आतून पाठिंबा तर देत नाही न असे तर्क वितर्क नागरिकांमध्ये होत आहे.