भारतात अनेक विमा कंपन्या असून त्यातील एलआयसी ही एक नामांकित कंपनी आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमी आकर्षक योजना बाजारात आणत असते. ज्यामुळे ग्राहकांना कमी पैशांमध्ये जास्त लाभ मिळतील.
आता काय आहे हा प्लान जाणून घेऊयात. ‘जीवन लाभ 836’ असे या प्लॅनचे नाव असून जीवन लाभ 836 च्या प्लॅनमध्ये तुम्ही दिवसाला केलेली साठ रुपयांची बचत तुम्हाला तेरा लाख रुपये मिळवून देऊ शकते. हो हे खरंय पण ही पॉलिसी 8 ते 50 वर्षे वय असलेल्या व्यक्तींसाठी आहे.
या पॉलिसी नुसार तुमचे वय जर 8 वर्षे असेल आणि 5 लाख रुपयांचा सम अशॉर असेल तर 16 वर्षांपर्यंत तुम्हाला याचे प्रीमियम भरावे लागतील.
या 16 वर्षांमध्ये तुम्हाला जवळजवळ 3 लाख 55 हजार रुपये भरावे लागतील. त्यानंतर नऊ वर्षांच्या अंतराने तुम्हाला याचे 13 लाख रुपये माघारी मिळतील.