शेवगाव :- जलसंधारणसह रस्ते विकास व इतर कामांकरिता आमदार मोनिकाताई राजळे यांनी शासनाच्या विविध योजनेतून विकासकामाला भरीव निधी देण्याचे काम केले. अल्पावधीत शेवगाव पाथर्डी मतदार संघातील विकासाची गती वाढवुन विकास कामाचा डोंगर उभा केला.
तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात सर्वाधिक विकास कामे झाल्याने हा संपूर्ण परिसर जात, पात, धर्म भेद विसरून आमदार राजळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे माहिती युवा नेते पुरुषोत्तम आठरे यांनी दिली.
अल्पसंख्यांक निधीतून जमातखाना, जि.प.सदस्या संध्या आठरे यांच्या माध्यमातून बंधारा यासह विविध विकास कामाचे आ.राजळे यांच्या हस्ते मढी येथे उद्घाटन झाले.
या वेळी पुरुषोत्तम आठरे,रवींद्र वायकर,सरपंच रखमाबाई मरकड, उद्धव ससे ,बबन तात्या मरकड, माजी सरपंच भगवान मरकड , देवस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड ,माजी सरपंच देविदास मरकड, माजी उपसरपंच रविंद्र आरोळे,
सचिव सुधीर मरकड, ग्रामपंचायत सदस्य,तईमुन्ना शेख , विजयाताई शिदोरे, बाळासाहेब मरकड , पोपट शेख, भाऊसाहेब पाखरे, मुस्ताक शेख, नाथा मरकड, भानुविलास मरकड, शिवाजी मरकड , आयुब शेख , शंकर पाखरे, दादासाहेब मरकड, बाबासाहेब कुटे,ग्रामसेवक दिलीप मिसाळ आदी उपस्थित होते.
मतदारसंघात सर्वाधिक निधी शासनाकडून राजळे यांनी मिळाला .स्व.राजीव राजळे यांची उणीव त्यांनी कार्यकर्त्यांना कुठेही जाणून दिली नाही असे सरपंच रखमाबाई मरकड यांनी सांगितले . पूजा साहित्य विक्री करणाऱ्या चार दुकाने आगीत जळून खाक झाले
या घटनास्थळी आ.राजळे यांनी भेट देऊन पाहाणी केली. मढी रस्त्यावर वाढलेली भाविकांची रहदारी आणि त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन येथील या रस्ताचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन आ.राजळे यांनी दिले