ब्रेकिंग

आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार! संभाजीराजेंचे पोस्टर

Maharashtra news : राज्यसभा निवडणुकीत अडचणी येत असल्याचे पाहून कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांचे समर्थक आता आक्रमक झाले आहेत. राज्यसभेचा नाद सोडून आता पुढील निवडणुकांसाठी सज्ज व्हावे, असा एक सूर उमटू लागला आहे.

शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवत संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा नाकारल्यानंतर मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या संभाजीराजे समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले जात आहे.

आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार, असा मजकूर या पोस्टरवर लिहला आहे. शिवसेनेने संभाजीराजे यांच्याशी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली आहे, असा आरोपही केला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता संभाजीराजे यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts