अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अकोले तालुक्यात कोरोना बाधित पॅाझिटीव्ह रुग्णांचे लोण ग्रामीण भागातून वाढताना दिसत आहे. तर शहरात त्याने अगस्ती साखर कारखाना रोड वरून आता थेट तहसिल कार्यालयात प्रवेश केला आहे.
तहसिल कार्यालयातील एक ३५ वर्षीय कर्मचाऱ्यांचा कोरोना बाधित पॅाझिटीव्ह अहवाल आला आहे. तहसिल कार्यालयात कायम बाहेरून येणाऱ्या लोकांची वर्दळ असते.
त्यामुळेच नागरिकांशी नेहमी संपर्क येणारा या कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाल्यानंतर पॅाझिटीव्ह रुग्णांची संंख्या ७५ वर पोहचली आहे.
त्यापैकी ४८ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून ३ जण उपचारादरम्यान मयत झाले आहेत तर २४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
अकोल्यात अगस्ती साखर कारखाना रोडलगत दोन बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येऊन त्यांचा निगेटिव्ह अहवाल येत नाही तोच शनिवारी तहसील कार्यालयातील कोरोनाने दोन कारकूनांना कोरोनाची लागण झाली.
उपचार घेण्यात पाच दिवस दिरंगाई केेेल्याबचा आरोप होत आहे. त्याचे नवलेवाडी फाट्यावर निवासस्थान आहे. त्याने हे दिवस स्वतः होमक्वारंटाईन झाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com