ब्रेकिंग

अरे बापरे! तरुणाचा खून करून,गुंप्तांग जाळण्याचा प्रयत्न; पहा कुठे घडली ही घटना….वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  राज्यात सगळीकडे गुन्हेगारी वाढत असून, शहरात जानेवारीच्या पहिल्या महिन्यात ही खुनाची तीसरी घटना असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. याआधी शहरातील व्यवसायिक हसन साजेद पटेल यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, आता औरंगाबाद शहरात हादरवून टाकणारा आणखी एक खून झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील मैदानात 36 वर्षीय एका तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे . तसेच त्या तरुणाला दगडाने ठेचून त्याला संपवण्यात आले असून, आग लावून त्याचे गुप्तांग जाळण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तब्बल 48 तासांपूर्वी खून झाला असून आता हा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे.

तसेच आरोपींची शोधाशोध सुरू केली आहे. या संदर्भात अज्ञात आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सदर घटनेतील आरोपींचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office