पारनेर :- तालुक्यातील खडकवाडीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने मायलेकासह तिघांना जोरदार धडक दिली. यात तिघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकारामुळे वाळू तस्करांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डम्परने चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू
एमएच 16 वाय 1914 या क्रमांकाच्या मोटारसायकल वरून जात असलेल्या गोरक्ष कोंडीभाऊ मेंगाळ (वय 40) बुधाबाई कोंडीभाऊ मेंगाळ (वय 68( दोघेही राहणार नागापूरवाडी ता. पारनेर) सुमन पंढरीनाथ डेेंबे (वय 75, रा.वनकुटे ता.पारनेर) या तिघांना भरधाव जाणार्या वाळूच्या डम्परने चिरडल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
डंपर चालक डंपरसह पसार !
डंपर चालक डंपरसह पसार झाला आहे. या परिसरामध्ये अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्या वाहनांची संख्या जास्त आहे. दिवस रात्र हे वाहन या रस्त्यांनी धावत असतात. प्रशासनाचा देखील यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रणात राहिलेला नाही त्यामुळे भरधाव वेगानं ही वाहने धावत असतात व अनेक जणांना यांच्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत.