पारनेर तालुक्यातील युवकाची आत्महत्या.

पारनेर :- तालुक्यातील वडगाव सावताळ येथील किरण छबन निवडुंगे (वय २१) या युवकाने आपल्या राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ३ रोजी दुपारी १२.०० च्या सुमारास घडली. 

किरण निवडुंगे याचे आई -वडील हॉटेलवर काम करत होते. तर किरण हा घरीच होता. त्याने घरातच गळफास घेऊन आपली ज़ीवनयात्रा संपवली. आई घरी आल्यानंतर आवाज देऊनही दरवाजा न उघडल्यामुळे तिने खिडकीतून डोकावून पाहिल्यावर आरडाओरड केला.

 

एकुलता एक मुलगा…

गावातील तरुणांनी तातडीने त्याला टाकळी ढोकेश्वर येयील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय आधिकारी विजय गणबोटे यांनी सांगितले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. किरण हा आई -वडिलांना एकुलता एक मुलगा होता.

 

अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ

शिक्षणाबरोबरच गावात हॉटेल व्यवसाय करणाऱ्या वडिलांना तो मदत करत असे. तो अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांत खबर दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Parner

Recent Posts