बिग ब्रेकिंग : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरातील ‘हा’ भाग झाला कंटेनमेंट झोन !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : नगर शहराच्या केडगावमधील शाहूनगर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

दिनांक 15 ते 28 जूनपर्यंत या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने वस्तू विक्री सेवा बंद राहतील. तसेच नागरिकांच्या येण्या जाण्यावर निर्बंध लागू होणार आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी अध्यादेशाद्वारे याबाबत माहिती दिली.

कंटेनमेंट झोनमध्ये साईनगर प्रोव्हिजन, शाहूनगर चर्च, साईराम ट्रेडर्स, संकेत ढवळे घर, मथुरा ब्युटीपार्लर, समर्थ निवास – भोस यांचे घर, बी आर कवडे, दत्तात्रय जवक घर ते मुख्य रस्ता या परिसराचा समावेश आहे.

व बफर झोनमध्ये बँक कॉलनी, साई मंदिर परिसर, शाहू नगर जिल्हा परिषद शाळेचा दक्षिण भाग, शारदा मंगल कार्यालय, साईराम ट्रेडर्स

पश्चिमेचा परिसर, राजेंद्र टाक घर, शाहूनगर अंगणवाडी परिसर, मिलिंद हाउसिंग, मुळे कॉलनी, रेणुका नगर ते गणपती मंदिर परिसर या भागाचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts