अहमदनगर :- महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला साथ दिल्याप्रकरणी २८ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीने ७ दिवसांत खुलासा करण्याची नोटिस १८ नगरसेवकांना बजावून कारवाईचा इशारा दिला होता.
खुलासा गायब झाला की गायब केला ?
त्यानुसार नगरसेवकांनी खुलासाही पाठवला होता, तथापि, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी १८ नगरसेवकांनी खुलासा न दिल्याचे कारण पुढे करत नगरसेवकांना बडतर्फ केले. त्यामुळे आता नगरेसवकांनी दिलेला खुलासा गायब झाला की गायब केला ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महापौर निवडीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी १४ जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला साथ देऊन सत्तेत आणले. या समिकरणामुळे राज्यभरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच याप्रकरणी गंभीर दखल घेत कारवाईचा इशारा दिला होता.