महापालिकेच्या 50 टक्के निधी खर्चास स्थगिती

अहमदनगर: महापालिका अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आणि जाता जाता तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी खर्चास मंजुरी दिलेल्या 50 टक्के महापालिका निधीच्या खर्चास प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्थगिती दिली आहे.

महापालिका निधी म्हणून मोठ्या प्रमाणात निधीची मंजुरी अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. 

 

या  निधीस भालसिंग यांनी जाता जाता मंजुरी दिली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे आला. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला.

त्यानुसार अत्यावश्यक कामे वगळता महापालिका फंडातील कामे थांबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार उर्वरित 50 टक्के निधीतून आता केवळ अत्यावश्यक काम असेल, तरच ते होऊ शकणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts