अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नगर शहरात लॉकडाऊन करण्याच्या मागणीवर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती व लॉक़डाऊनची गरज नसल्याचे म्हटले होते.
त्यावर भाष्य करताना डॉ. विखे यांनी, पुण्यामध्ये पुन्हा लॉकडाउन का केले, हे तुम्ही (रोहित पवार) तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार) विचारले पाहिजे.
जामखेड व पारनेरला लॉकडाऊन करून तुम्ही (रोहित पवार) तुमचे मतदारसंघ सुरक्षित ठेवता व आमचे नगर लॉकडाऊन न करून धोक्यात ठेवता.
जेथे राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्यांतून लॉकडाउन झाले आहे, पण नगरला राष्ट्रवादीचे पालकमंत्री असूनही होत नाही, याला काय म्हणायचे, असा सवाल करून डॉ. विखे म्हणाले, ‘सोशल मीडियाचा वापर सर्वजण करीत आहेत.
मात्र, राष्ट्रवादीचे आमदार व मंत्री सोशल मिडियाच्या माध्यमातून वेगळाच अजेंडा राबवत आहेत. जी कामे झालीच नाहीत, ती पण झाल्याची दाखवत आहेत.
भूमिपूजने दाखवली जात आहेत, पण शासनाकडे ते काम करण्यास निधी आहे का, हे सांगितले जात नाही. भाजपच्या लोकांनी केलेल्या कामांची उद्घाटने राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री करीत आहेत
व ते सोशल मिडियावर टाकून त्या कामांचे श्रेय घेत आहेत, या पार्श्वभूमीवर, आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आमच्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया वापरणारच ना, असा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे आमदार तर ट्रॅक्टर चालवण्याचे, औषध फवारणी करण्याचे उद्घाटन केल्याचे फोटो टाकतात, असा दावाही त्यांनी केला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved