अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटकपूर्व जामीनसाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिलासा मिळाला नसून, आता पुढील सुनावणी दि.१ फेब्रुवारीला होणार आहे.
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
मात्र हत्येचा सूत्रधार बाळ बोठे अद्याप पसार आहे. बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावर गुरूवारी सुनावणी ठेवण्यात आली होती.
मात्र खंडपीठाने ही सुनावणी पुढे ढकलली असून आता दि.१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. पसार बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून बोठेच्या मागावर राज्यातील सर्वच पोलीस आहेत.
तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे. बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.