जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा नगर जिल्ह्यातील सर्वात मागास व दुष्काळी मतदारसंघ आहे. या वेळी खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन असणारे तरुण व कार्यक्षम नेतृत्व रोहित पवार यांच्या रूपाने लाभले आहे.
मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रिमंडळात वर्णी लावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांनी केली.
फक्त सत्ता असून उपयोग नाही, तर दृष्टिकोन विकासात्मक असायला हवा आणि आलेल्या निधीच्या प्रत्येक पैशाचा उपयोग जनतेसाठी आणि विकासासाठी व्हायला हवा.
आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यास त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे आपण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना भेटून रोहित पवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लावावी, अशी विनंती केली असे कोठारी यांनी सांगितले.