संगमनेर :- तालुक्यातील निझर्णेश्वर भागात हंगेवाडी परिसरात राहणा-या एका तरुणीला मी तुझ्याशी लग्न करील, असे म्हणून वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध रहात्या घरात शारीरिक संबंध करुन बलात्कार केला.
वेळोवेळी जर तू कोणाला काही सांगितले तर तुझी बदनामी करील, तुला जिवे ठार मारील, असे म्हणून बळजबरीने बलात्कार केला.
बलात्कार पिडीत तरुण महिलेने या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत काल फिर्याद दिल्यावरुन आरोपी मनोज वसंत कांगणे, रा. हंगेवाडी, ता. संगमनेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.