अकोले तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी

अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात कोरोनाचा सातवा बळी गेला. दरम्यान, गुरूवारी अँटिजेन टेस्टमध्ये १७ रूग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या २४५ झाली.

अकोले शहरातील निळवंडे पुनर्वसन वसाहत (सीडफार्म), कारखाना रोड (शेटे मळा) शिवाजीनगरसह तालुक्यातील धुमाळवाडी, समशेरपुर, हिवरगाव आंबरे व कोतूळ येथील व्यक्ती पॅाझिटिव्ह आढळल्या.

अगस्ति कारखाना रोड भागातील वृद्धाचा संगमनेर येथील रूग्णालयात रात्री मृत्यू झाला. कोरोनाचा हा सातवा बळी ठरला. गुरुवारी खानापूर येथील कोविड सेंटरमध्ये ७७ व्यक्तींच्या रॅपिड ॲन्टीजन कोरोना टेस्ट घेण्यात आल्या.

यात शहरातील निळवंडे पुनर्वसन वसाहतीतील १, शिवाजीनगर १, शेटे मळा १, धुमाळवाडी १, समशेरपूर ४, हिवरगाव आंबरे ६ व कोतूळ येथील ३ असे १७ जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले. १६८ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts