शेवगाव :- कर्जाला कंटाळून तालुक्यातील सुकळी येथील बबन आसराजी भवर (वय ५८) या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
त्यांचा मुलगा मच्छिंद्र बबन भवर याने दीड वर्षापूर्वी याच कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एकाच कुटुंबात कर्जामुळे दोघांनी आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
भवर यांचा मुलगा हरिदास याच्याकडे सेंट्रल बँकेचे दीड लाख रुपये, तर आत्महत्या केलेला मुलगा मच्छिंद्र याची पत्नी मंगल यांच्या नावे याच बँकेचे एक लाख रुपये कर्ज होते.
तसेच मच्छिंद्र याने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाने खासगी कंपनीकडून कर्ज घेऊन एक टेम्पो रिक्षा घेतली होती. तिचेही ८० हजारांचे देणे बाकी होते.
खासगी सावकाराचेही कर्ज होते. या सर्वांचे वारंवार तगादे येत असल्याने आलेल्या नैराशातून त्यांनी रविवारी रात्री विषारी औषध पिऊन केले.
त्यांच्यावर येथील नित्यसेवा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास निधन झाले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.