अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- जिल्हा शासकीय रुग्णालयाने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांपैकी १४ जणांचे अहवाल सोमवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. ते सर्व निगेटिव्ह आहेत.
मंगळवारीदेखील ३१ जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याने आणखी दिलासा मिळाला. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण जामखेड शहरात आढळले असून जामखेड हॉटस्पॉट म्हणून प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केला आहे.
विशेष म्हणजे मार्च, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वाधिक रुग्ण नगर शहर व तालुक्यात होते. त्यातील बहुतांशी रुग्णांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे.
आता मात्र जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण असलेला तालुका म्हणून जामखेडपुढे आला आहे. जामखेडमध्ये एका मृत व्यक्तीमुळे पाच कुटुंबांतील तब्बल ११ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
जामखेड शहरात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक करोना रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर करोना प्रसाराची साखळी तोडून फैलाव रोखण्यासाठी सर्वाधिक चाचण्या घेण्यात येत आहेत.
जे संशयित घाबरत होते, नाव सांगत नव्हते अशा लोकांचा प्रशासनाच्या मदतीने शोध घेऊन त्यांचीही चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्या घेण्याबरोबरच त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®