धक्कादायक : कोविडसेंटर न सांगता हलवले !

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :-  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह आहे हे न सांगता कोविड सेंटरमध्ये ठेवून आम्हाला अंधारात ठेवण्यात आले. तसेच कोविड सेंटरमधील वैद्यकीय सर्व सामान घेऊन हे सेंटर बंद करतानाही कोणतीही कल्पना दिली नाही. कोविड सेंटर चालू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही.

त्यांच्या निष्काळजीपणाबाबतची तक्रार श्रीरामपूर मधील अजितदादा पवार पॉलिटेक्निकलचे प्रमुख बाळासाहेब पवार यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे केली आहे. कोविड सेंटर सुरू करण्याबाबत तहसीलदारांचा आदेश येताच आम्ही या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले. वीज वितरणचे अधिकारी पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांना आमच्या येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले.

परंतु ते पॉझिटिव्ह आहे हे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणालाही सांगितले नाही. त्या ठिकाणी आमचे संस्थेचे कर्मचारीही मदत म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे कपडे, बेड व अन्य साहित्य तसेच पडून होते ते सर्व आमच्या कर्मचाऱ्यांनी आवरलेही. त्यानंतर कळाले की, ते अधिकारी पॉझिटिव्ह होते. त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला.

शहरातील काही प्रतिष्ठित लोकांंनाही या ठिकाणी क्वारंटाइन करण्यात आले तेही निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह हे सांगितले नाही. तसेच येथील कोविड सेंटर अचानक बंद करून सर्व साहित्य अचानक नेण्यात आले. आम्हाला कोणतीही पूर्ण सूचना न देता अचानक बंद करण्यात आले. तेथे असलेली घाण, साहित्य तसेच टाकून गेल्याने आमच्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यांविरुध्द तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts