धक्कादायक : वडिलांना सांभाळण्यास नकार दिल्याने मुलगा आणि सुनेविरुध्द गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातल्या सावेडी भागातील निर्मलनगर (शिवनगर) येथे राहणारे वयोवृद्ध नागरिक रंगनाथ गणपत कांबळे यांचा सांभाळ करायला चक्क त्यांच्या मुलाने आणि सुनेनेच नकार दिलाय.

याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार या वयोवृध्द इसमाचा मुलगा सुनील रंगनाथ कांबळे, (वय ४९) , आणि त्यांची सून सिमा कांबळे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या वृद्ध दांम्पत्यास मुलगा व सून यांनी दि. १२ जुलै रोजी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. तसेच दमदाटी करत घराबाहेर काढले. याप्रकरणी मुलगा आणि सून यांच्याविरुध्द भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts