अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२८ ने वाढ झाली.
यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५४, अँटीजेन चाचणीत १२६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या २४८ रुग्णांचा समावेश आहे.
यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६०४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली.रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६९.८० टक्के इतके आहे.
दरम्यान काल सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४० रूग्ण आढळले होते. त्यानंतर या संख्येत आणखी १४ रुग्णांची भर पडली. यामध्ये,
अँटीजेन चाचणीत आज १२६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २४८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये,
दरम्यान, आज २२८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.मनपा ११४, संगमनेर १२, राहाता २६, पाथर्डी ३, नगर ग्रा.२५, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट १०, नेवासा २, पारनेर ८, राहुरी १०, शेवगाव १, कोपरगाव ३, श्रीगोंदा २, कर्जत ३, अकोले येथील ०२ रूग्णांना तर अँटीजेन चाचणीत बाधीत आढळून आलेले आणि आता बरे झालेल्या ०६ रूग्णांना आज घरी सोडण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com