श्रीगोंद्यात सरपंचास गावातील तरुणांकडून मारहाण !

श्रीगोंदा :- तालुक्यातील मुंगुसगावचे सरपंच रामदास कानगुडे यांच्यावर दि.२७ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील ५-६ इसमांनी जबर मारहाण केली.

दि.२७ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता कानगुडे हे मुंगुसगाव शिवारातील हॉटेल मातोश्री येथे जेवणासाठी गेले होते.

यावेळी गावातील सुजित सुनील इथापे, अजिंक्य विशाल धुमाळ, किरण अनिल कानगुडे, संकेत बबन कानगुडे, दीपक बोरुडे हे तरुण तेथे गेले व कानगुडे यांना शिवीगाळ करून त्यांच्या गाडीची मोडतोड केली.

तसेच त्यांच्या खिशातील ८ हजार रूपये काढून घेतले. या वेळी प्रशांत चंद्रकांत धुमाळ यांनी त्यांना सोडवले.

याबाबत रामदास कानगुडे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यास गेले असता त्यांची फिर्याद दाखल करून न घेता तक्रार अर्ज दाखल करून घेतला व माघारी पाठवले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Shrigonda

Recent Posts