अहमदनगर Live24 टीम,10 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात २४ तासांत कोरोनामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बळीची संख्या १०६ झाली. रविवारी आणखी ४८३ रुग्ण आढळून आले. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ४१ बाधित आढळले.
यात नगर मनपा २३, संगमनेर १, राहाता १, नगर ग्रामीण १०, कँटोन्मेंट १, नेवासे २, शेवगाव १ आणि कोपरगावच्या २ रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत २५७ बाधित आढळले.
यामध्ये संगमनेर ३३, राहाता २२, पाथर्डी ४८, नगर ग्रामीण १३, श्रीरामपूर ६, कॅन्टोन्मेंट २१, नेवासे २१, श्रीगोंदे २१, पारनेर ११, अकोले ४, राहुरी १०, शेवगाव ९, कोपरगाव ४, जामखेड १० आणि कर्जत २४ रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत १८५ पाॅझिटिव्ह आढळले. यामध्ये मनपा १४७, संगमनेर ९, पाथर्डी १, नगर ग्रामीण ८, श्रीरामपूर ३, कॅन्टोन्मेंट ४,
नेवासे १, श्रीगोंदे १, पारनेर २, अकोले २, राहुरी ५, शेवगाव १ आणि कोपरगाव १ रुग्णाचा समावेश आहे. रुग्णांची संख्या आता ९ हजार ७२३ झाली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved