अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी ७ जणांचा मृत्यू झाला. बळींची संख्या १ हजार ३२ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात नवे १२५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के झाले आहे. नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४९ आणि अँटीजेन चाचणीत ४४ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, जामखेड १, कर्जत २, नगर ग्रामीण ६, पाथर्डी १, राहाता ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७, अकोले १, कोपरगाव ६, नगर ग्रामीण ५, नेवासे ३, पारनेर १, पाथर्डी १, राहाता ४, राहुरी ४, संगमनेर ६, श्रीरामपूर २, कॅन्टोन्मेंट २, इतर जिल्हा ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत ४४ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ३०, कोपरगाव २, नगर ग्रामीण १, नेवासे २, राहाता १, संगमनेर ३, शेवगाव ४, श्रीगोंदे १ अशा रुग्णांचा समावेश आहे.