Ahmadnagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे, स्वतःच्या पोटावर, गळ्यावर धारदार बेल्डने वार करून एका ३५ वर्षीय विवाहित तरुणाने त्याची
जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना शहरातील संजयनगर परिसरात घडली असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. संजय लक्ष्मण अल्हाट (राहणार संजयनगर, कोपरगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की कोपरगाव शहरातील संजयनगर परिसरातील ३५ वर्षीय विवाहित तरुण संजय लक्ष्मण अल्हाट याने गुरुवार ७ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी अज्ञात कारणाने स्वतःच्या पोटावर, गळ्यावर धारदार बेल्डने वार करून आपली जीवनयात्रा संपवली.
ब्लेडने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याच्या नातेवाईकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते; मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय उंबरकर यांनी सांगितले.
डॉ. संजय उंबरकर यांनी शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली असता शहर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल ए. एम. दारकुंडे करीत आहेत.