जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडून नगरकरांसाठी थँक्यू.. !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- “जनता कर्फ्यू” यशस्वी करणाऱ्या जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे सावेडीतील भिस्ताबग चौकात नगरकरांनी स्वागत केले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनीही नगरकरांचे आभार मानले. नगरच्या सावेडी उपनगरात जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडून नगरकरांसाठी थँक्यू.. थँक्यू… थँक्यू…असे भावनात्मक उच्चार निघाले.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरात फेरफटका मारुन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, ग्रामीण भागातील परिस्थितीबाबत वारंवार उपविभागीय अधिकारी आणि संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून माहिती घेतली.
नगर शहरातील महत्वाचे चौक, बाजारपेठा आज अक्षरश: ओस पडल्याचे चित्र होते. कापड बाजार, चितळे रोड, पाईपलाईन रोड, प्रोफेसर चौक, दिल्ली गेट असे गर्दीने गजबजलेली ठिकाणी आज शुकशुकाट होता.
कोरोनाशी लढण्यासाठी प्रत्येकजण जणू वचनबद्ध असल्याची ग्वाही या कृतीतून नगरकरांनी दाखवून दिली. शहरातील माळीवाडा, तारकपूर आणि स्वस्तिक बसस्थानकांवर प्रवाशांची अजिबातच ये-जा नव्हती. बसेसही बंद ठेवण्यात आल्या होत्या.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts