अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- साईबाबा प्रसादलयासमोरील पार्किंगमधून अपहरण झालेले बाळ निमगाव शिवारात एका शेतात आढळून आले. चोवीस तासानंतर पाच महिन्याचे बाळ आपल्या मातेच्या कुशीत सुखरुप परतल्याने शिर्डी पोलिसांसह व तपास घेणाऱ्या निमगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.
या मुलीस पळवून नेणारा अपहरणकर्ता मात्र मुलीस टाकून फरार झाला आहे. शिर्डी पोलिस त्याचा शोध घेत आहे. साईबाबा प्रसादलयासमोरील पार्किंगमधून मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झोळीत झोपलेल्या अवघ्या पाच महिन्याच्या बाळास एक अज्ञात तरुण घेऊन गेला होता.
ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने यात दिसणाऱ्या तरुणाच्या वर्णनावरुन पोलिसांनी शोध सुरु केला होता. बसस्थानक, रेल्वे स्थानकासह परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहाय्याने शोध मोहीम हाती घेतली होती. यासाठी चार पथके रवाना केली होती. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता निमगाव शिवारात शिंदेमळ्याजवळ एका वृद्ध महिलेस बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
याबाबतची माहिती त्यांनी परिसरातील नागरिकांना दिली. निमगावचे सरपंच कैलास कातोरे यांच्यासह साई मल्हारच्या कार्यकर्त्यांनी या मुलीस ताब्यात घेतले. पाेलिसांना कळवताच सहायक पाेलिस निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे व सहकाऱ्यांनी मुलीस ताब्यात घेतले. बाळाच्या अधिक तपासणीसाठी माता व बाळास घेऊन पोलिस नगर जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले आहेत. या बाळाचे अपहरण कशासाठी केले, पळवून नेण्याचा उद्देश काय? हे अपहरणकर्ता सापडल्या नंतरच समजणार आहे. अपहरणकर्ता फरा झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com